कुठे साद घालू ? कुठे आहेस तू ? एकटा मी इथे, परतुनी त्वरी ये तू ! उरी स्मृती तुझ्या , गातोय रोज विराणी घेशील का धाव, ऐकून माझी गाणी सांग ऐकलीस का तू ? फिरतोय चौफेर साऱ्या, दडलीस कोण्या दारीथकलीत पाऊले माझी , फिरून दुनिया सारीसांग आहेस कुठे तू? नसण्याने दु:खी तुझ्या, सलतोय एकटेपणा मरावं कि जगावं ? करू काय सुचेना ?सांग आता उत्तर तू ! न आसरा कुणाचा, न दिसे कुठे किनारा शोधतात नेत्र तुला , लपाछपीचा खेळ सारा सांग दिसशील कुठे तू ?

FunnyTube.in