एकच चहा, तो पण कटिंग…
एकच पिक्चर, तो पण टॅक्स फ्री…
एकच साद, ती पण मनापासून…
आणखी काय हवं असते मित्राकडून ?

एकच कटाक्ष, तो पण हळूच…
एकच होकार, तो पण लाजून…
एकच स्पर्श, तो ही थरथरून…
अजून काय हवं असतं प्रियेकडून ?

एकच भुताची गोष्ट, ती पण रंगवून…
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून…
एक जोरदार धपाटा, ते ही शिवी हासडून…
अजून काय हवं असतं आजीकडून ?

एकच मायेची थाप, ती ही कुरवाळून…
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून…
एकच आशिर्वाद, तो ही डोळ्यात आसवं आणून…
अजून काय हवं असतं आईकडून ?

एकच कठोर नकार, तो ही हृदयावर दगड ठेवून…
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोगऱ्या आवाजातून…
एकच नजर अभिमानाची, ती पण आपली प्रगती पाहून…
अजून काय हवं असतं वडिलांकडून ?

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून…
स्वर्गच जणू मिळाला, तो पण न मागून..
फाटकी झोळी हि माझी, ती पण वाहिली भरून…
अजून काय हवं मला आयुष्याकडून ? 😇

FunnyTube.in