शाळा भरती साडे बाराला

मी घर सोडत साडे अकराला

करी घाई तिला एक नजर पाहायला

वाटे मज्जा तिची वाट अडवायला

तिला येता पाहून

फिरवी हाथ डोक्यावरून

तिचे लक्श वेधावे म्हणून

पण ती जाई अनोळखी समजून

करी रोज प्रार्थना देवाकडे

आज तरी तिने पाहावे माझ्याकडे

मग निघती माझी स्वारी शाळेकडे

ठेवूनिया देवापुढे पाच नारळाचे तुकडे

आज पहिले तिने मला हसून

मी तर तितेच गेलो भारावून

पुढे गेली मैत्रिणीच्या कानात पुटपुटून

शाळेच्या मागे भेट असे सांगून

ठरलं होत शाळा सुटल्यावर भेटायचं

मी तर सुरु केले काम स्वप्न रंगवायच

मस्त हातात हात घालून फिरायचं

मात्र प्रत्यक्षात अवघड झाले बोलायचं

काय बोलावे काही सुचेना

तिला लाजण्याविना काही येईना

बोलायला दोघेही प्रारंभ करेना

कंटाळून मैत्रीण म्हणाली काहीतरी बोलाना

मीच केली सुरवात बोलायला

लागलो माझ्याच बढाया मारायला

तीही लागली होती हसायला

मन लागले होते तिच्या खळीत बुडायला

लागलो होतो अधूनमधून भेटायला

खूप काही असे दोघांकडे बोलायला

कधी ती कधी मी जात घरी सोडायला

दोघेही लागले होते एकमेकात रुळायला

केली सुरवात पैसे जमवायला

तिला एक सुंदर गिफ्ट द्यायला

करी संकोच ती गिफ्ट घ्यायला

दिला नकार लाल गुलाबाला

त्या क्षणी आभाळ माझ्यावर कोसळले

तिने मैत्रीच्या नावाखाली गिफ्ट होते घेतले

पण तिला नाही कधी कळले

किती तुकडे तिने माझ्या हृदयाचे होते केले

वाटे मनाला तिने मला फसवले

मित्र म्हणुनी हाथ होते तिने धरले

मला नवते कधी ते समजले

वाटले स्वःताला उगाच तिच्या प्रेमात होते

पडले

शेवटी पहिले प्रेम अर्धवट राहिले

नव्याने आता दुसऱ्यात शोधू लागले.

पण अजूनही नाही कधी तिला विसरू शकले……

FunnyTube.in