हि कविता म्हणजे मुलाने मुलीकडे केलेला प्रेम प्रस्ताव आहे. ज्याला तुम्ही ‘प्रपोज ‘ असे हि म्हणता.

या मुलाला तीच काय उत्तर असेल याची खात्री नाही तरीही खूप हिम्मत करून तो आपल्या मनातला प्रेम प्रस्ताव तिच्या समोर या कविते मार्फत मांडत आहे.

त्यात त्याने तिचा नकार ऐकण्याची हि तैयारी दाखवली आहे. तो म्हणतोय कि तू नाही म्हणालीस तरी मी दुखी नाही होणार जसा जगात होतो तसाच जगात राहणार. आणि तिला आपला त्रास होऊ नये म्हणून तिच्या समोर पुन्हा कधी न येण्याची खात्री हि तो तिला देतोय.

असा प्रस्ताव तुमच्या हि वाट्याला आला असेल किंवा असाच प्रस्ताव मांडण्यासाठी तुम्हीही कधी मनाची कविता केली असेल……..??

या मुलाचा हा प्रेम प्रस्ताव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट द्वारे नक्की सांगा. तुमच्या उत्तराची वाट बघतोय……

” आस शेवटची ”

कसे दावू तुजला प्रिये…?

मन माझे वेडे…

आजही पाही अपेक्षेने…

व्याकूळ होऊन तुझ्याच कडे…

वाटे आजही उरली आहे

ती आस कुठेतरी…

माझ्या मनातला प्रेमाचा दिवा…

त्याचा प्रकाश असेल तुझ्यात जरातरी…

माहित आहे नाही तू माझी

न होतीस कधी ना होशील कधी…

तरीही शेवटची आस विचारतो…

वाट चुकून अशी येशील का मनामधी…?

नाही म्हणालीस जरी तू

नाही दुखी होणार मी…

जगत होतो जगत आहे जगतच राहणार मी…

आता निरोप घेतो…

दुःखी नको होऊस तुजसमोर नाही पुन्हा येणार मी….

TopJokes.in