तुझ्यावर खुप दिवसांपासुन

लिहायचे म्हणतो

पण तुझ्यासाठी शब्दच सापडत

नाहीत

तुझा विषय निघाला की शब्द

हरवतात

कारण तेंव्हा मी मी नसतो..

आसमंतात तुला शोधत भरकटत

असतो….

पण नेहमीप्रमाणे निराशा होते

हातातली सिगारेट

पुन्हा भानावर आणते

तु नसुनही कायम बरोबर असते

सुखदु:खाच्या हर एक

क्षणी खांद्याला खांदा लावुन

असते

आनंदाच्या वेळी तुझा बेभानपणा भासतो

निराश मनाची समजुत

काढणारी तुच असते

तुझी प्रतिमा मी रोज रंगवत

असतो

तुझ्याशी मी रोज

बोलतही असतो

थट्टा

मस्करी आणि भांडणही होते

तरीही तु कोण आहेस? कुठे

आहेस? कशी आहेस?

एक ना अनेक प्रश्न

आजही अनुत्तरीत आहेत …

पण एक दिवस तु समोर येणार

आणि

तेंव्हा मात्र शब्दांचा पाऊस

मुसळधार बरसणार..!!

TopJokes.in