।। मराठा म्हणावे अशा वाघराला ।।

भाग १

दिला एकदा शब्द न पालटावा। पुढे

टाकला पाय मागे न घ्यावा ।।

धरें जो स्वयंभू शिवाजीपथाला।

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।।

कधीँ शत्रूचे घाव ना पाठीवरती ।

रणीं झेलतो सिंहसा धातीवरती ।।

हाकारुनी आव्हानतो जो यमाला ।

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।।

जरी शत्रुकांता प्रसंगी दिसेल ।

तिला साडीचोळीनिशीं पाठवील ।।

कधीं स्वप्नीँ ना पाप

स्पर्शेमनाला ।

मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।।

महावादळांच्या विरोधांत ठाके।

पुढें संकटांच्या कधीं हि न वाके ।।

पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला ।

मराठे म्हणावे अशा वाघराला ।।४।।

मनीं धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा ।

उरीं देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा।।

सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला ।

मराठा म्हाणावे अशा वाघराला ।।५।।

TopJokes.in